करमाळा शहर व तालुक्यात सोमवार दिनांक 3 ॲागस्ट रोजी 6 कोरोना पाॅझिटीव्ह एकुण रुग्णांची संख्या 165

करमाळा प्रतिनिधी सोमवार दिनांक 3 ॲागस्ट रोजी करमाळा शहरात 68 एॅंटाजीन टेस्ट घेण्यात आल्या असून यामध्ये. 6 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आले असुन 62 निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे. करमाळा शहरातील सिद्धार्थनगर – 2 यामध्ये 1 पुरुष व 1 महिला, श्रीदेवीचामाळ -2 पुरुष, कृष्णाजीनगर येथील -1 पुरुष, भिमनगर -1 महिला यांचा समावेश आहे. 3आॅगस्टरोजी एकुण कोरोना 6 असुन आतापर्यंत एकुण रुग्णांची संख्या 165 झाली आहे. या मध्ये आतापर्यंत पुर्ण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 72 असुन 90 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत व तीन व्यकतींचा मृत्यू झाला आहे. करमाळा शहरात कोरोना रुग्ण वाढत असून नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.

