जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज इन्स्टिट्यूटचा सलग दुसऱ्यांदा इयत्ता दहावीचा 100% निकाल

करमाळा प्रतिनिधी. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज इन्स्टिट्यूटचा सलग दुसऱ्यांदा इयत्ता दहावीचा 100% निकाल लागला आहे.जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज इन्स्टिट्यूटचा (इंग्रजी माध्यम) इयत्ता दहावीचा दुसऱ्या बॅचचा निकाल १०० टक्के लागला या शाळेची विद्यार्थिनी कु आर्या प्रसन्न पाखरे हिने सर्वाधिक ९८.६०गुण मिळून दैदिप्यमान यश मिळवले यामुळे निश्चितच संस्थानाच्या व शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
इन्स्टिट्यूटच्या पहिल्या बॅचचा निकाल शंभर टक्के लागला होता व यावर्षी सुद्धा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत तसेच शिक्षणामध्ये आणखी दर्जेदारपणा व गुणवत्ता मिळवली आहे या विद्यालयाचे दहावीला बसलेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आर्या पाखरे ९८.६० गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली, पार्थ पाखरे ९६.८० टक्के गुण मिळवून द्वितीय आला व श्रेया सोनवणे, ९५.२० टक्के गुण मिळवून तृतीय आली.
या सर्व विद्यार्थ्यांना जगद्गुरु श्रींचे बहुमूल्य असे मार्गदर्शन व कृपाशीर्वाद मिळाले. जगद्गुरू श्रींचे ध्येय डोंगराळ व ग्रामीण भागातील गरीब दुर्लक्षित व होतकरू मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण व संस्कार देण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या संस्थेची वाटचाल सुरू आहे आणि त्या वाटचालीची खऱ्या अर्थाने आज ध्येयपूर्ती कडे वाटचाल होताना दिसत आहे याचा मनस्वी आनंद आहे.
या वाटचालीमध्ये नंदयशोदा योजनेचे सर्व दाते, इतर योजनेतील दाते, संस्थांचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे चेअरमन अर्जुन फुले सर, मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी संप्रदायातील सर्व स्तरावरील पीठ प्रमुख ते संतसंघापर्यंतचे सर्व पदाधिकारी प्रसारक सर्व गुरु बंधू-भगिनी व भक्त शिष्यगण या सर्वांच्या योगदानातून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडत आहे.
मिळालेल्या यशाबद्दल जगद्गुरु श्रींनी शारीरिक ,आर्थिक व मानसिक मनोबलाचे मोती गुंफनाऱ्या व मोत्याच्या माळेचे दैदिप्ययशामध्ये रुपांतर करणाऱ्या सर्वांना खूप खूप आशीर्वाद दिले व मनस्वी अभिनंदन केले.
