सामाजिक उपक्रम घेऊन भाजयुमो प्रदेश सचिव दिपक चव्हाण यांचा वाढदिवस साजरा.
करमाळा प्रतिनिधी
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥
दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे ।
देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम् ॥
दिपक चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने करमाळा शहरातील गोर गरीब वृद्ध निराधारांना जेवण वाटप करण्यात आले. राशीन पेठेतील श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजनेत जेवण वाटप तसेच जगदंबा कमलाभवानी मूकबधिर निवासी विद्यालय, श्रीदेवीचा माळ येथे सर्व मूकबधिर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कुंभार, मूकबधिर शाळेचे शिक्षक पाटणे सर,प्रतिक चव्हाण,किरण कांबळे,सागर दळवी,विनायक दाभाडे, संतोष कांबळे,महादेव गोसावी,महेश गोसावी, प्रेमसिंग परदेशी यांनी खारीचा वाटा उचलत या योजनेत सहभाग नोंदवला.
