लाडक्या बहिणींचा विजय, आपला भाऊ “दिग्विजय”दिगंबरराव बागल
करमाळा प्रतिनिधी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्या प्रचारार्थ करमाळा तालुक्यातील फिसरे या गावी मा. रश्मी दीदी बागल – कोलते (प्रदेश उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र) आणि प्रियांका दिग्विजय बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत “लाडकी बहीण मेळावा” आयोजित करण्यात आला.
यावेळी सर्व लाडक्या बहिणींनी प्रेमाने व आदराने स्वागत केले. महाराष्ट्राची ही निवडणूक स्त्रीशक्तीची निवडणूक आहे. यावेळी आमच्या माय माऊली करमाळ्याचे भवितव्य घडवतील असे चित्र होते. महायुतीने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या पक्षांनी स्पष्ट केले आहे की ते ही योजना बंद करतील. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी निर्णय घेतला आहे की आपल्या स्वप्नांना पंख देणाऱ्या महायुतीलाच साथ द्यायची!गावातील भगिनी, मायमाऊली ‘लाडकी बहीण योजने’ द्वारे मिळालेल्या पैशांतून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत, कुटुंबाचा गाडा पुढे हाकत आहेत. यात भर म्हणून राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनी योजनेची रक्कम १५०० वरून २१०० करण्याची घोषणा केली आहे.म्हणूनच सर्व लाडक्या बहिणींनी ठरवलं आहे , आपल्या स्वप्नांना बळ देणाऱ्या शिवसेना – महायुतीचे उमेदवार दिग्विजय भैय्या बागल यांना २० तारखेला मत देऊन निवडून आणायचं!यावेळी फिसरे गावातील समस्त महिला वर्ग, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
