कमलाई मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे डॉ. विशाल केवारे यांचे अभिवचन दुग्ध उत्पादकांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
करमाळा प्रतिनिधी शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय हा उत्तम जोड व्यवसाय असून दूध उत्पादन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय समृद्ध करण्यासाठी कमलाई दूध आणि दूध मिल्क प्रोडक्टस आपल्या सदैव पाठीशी असल्याचे मत कमलाई मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसचे सर्वेसर्वा डॉक्टर विशाल केवारे यांनी व्यक्त केले. कमलाई मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट च्यावतीने कुंभेज येथे सुप्रीम हॉटेल येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दिवाळीनिमित्त सालाबादप्रमाणे स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी दूध डेअरीचे चेअरमन दूध उत्पादक शेतकरी सभासदांना दिवाळीनिमित्त स्नेह भोजन ,मिठाई गिफ्टचे वाटप करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना डॉक्टर विशाल केवारे म्हणाले की अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जरी आपले नुकसान झाले असले तरी पिके हातची गेली असली तरी दुग्ध व्यवसाय आपले जीवन समृद्ध करण्यासाठी येत्या काळात आपणास या संकटातून सावरण्यासाठी मदत करणार असून या व्यवसायाला आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विस्तार वाढीसाठी सर्व प्रकारचे सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्याला करमाळा, परांडा, बार्शी तालुक्यातील तालुक्यातील चेअरमन, शेतकरी दुग्धोत्पादक सभासद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमलाई दूध अँड दूध मिल्क प्रॉडक्टचे यांच्याकडे झोनल मॅनेजर राजू केंद्रे, मॅनेजर अजय लगस, अकाउंट मॅनेजर अक्षय रोडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय कदम, केमिस्ट विक्रांत कारंडे, सुरेश शिंदे, प्रशांत काळे व दूध डेअरीचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. दिवाळीनिमित्त सालाबाद प्रमाणे दूध उत्पादक सभासद चेअरमन यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा मोठ्या उत्साहामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.


