राजुरी ग्रामपंचायत च्यावतीने गुणवंत खेळाडू व मार्गदर्शकांचा सत्कार
राजूरी प्रतिनिधी शुक्रवार दिनांक. ३०/१२/२०२२ रोजी ग्रामपंचायत राजुरी ता. करमाळा व राजुरी ग्रामस्थ यांच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर आयोजित विविध क्रिडा स्पर्धेत योगदान मिळवलेल्या गुणवंत खेळाडू व मार्गदर्शकांचे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
श्री. राजेश्वर विद्यालय राजुरी ता. करमाळा जि. सोलापूर या प्रशालेतील हॅमर थ्रो खेळातील खेळाडू शुभम अजिनाथ शिंदे याचा जिल्हास्तरीय हॅमर थ्रो या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक आल्याबद्दल व जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेमध्ये श्री. राजेश्वर विद्यालयाचा द्वितीय क्रमांक आल्यामुळे प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री. मारुती संदिपान साखरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत राजुरीच्या कार्यालयामध्ये सरपंच डॉ. श्री अमोल दादासाहेब दुरंदे, ग्रामसेवक श्री गलांडे भाऊसाहेब, कैलास साखरे, गणेश जाधव, धनंजय जाधव, अजिनाथ शिंदे, दत्तात्रय दुरंदे, नवनाथ दुरंदे, बिभीशन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
