गुरुपौर्णिमेनिमित्त करमाळा येथील शाळा नंबर 2 येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बक्षीस खाऊ वाटप
करमाळा प्रतिनिधी गुरुपौर्णिमेनिमित्त शाळा नं २ येथे ए.टी.एस. व मंथन परीक्षेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण सोहळा प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अकबर सय्यद मुख्याध्यापक राजेंद्र जायभाय,अशोक ढाकणे, श्रीमंत हांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यांवेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पेन सेट ,प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट खाऊ वाटप करण्यात आले, यावेळी प्रशासन अधिकारी बनसोडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गुरुपौर्णिमेनिमित्त चि. मैनुद्दीन अकबर सय्यद, चि.आलीज मोहम्मद बागवान, चि. मलिक अकबर सय्यद, चि. पवार या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षका विषयी आपल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक श्री. राजेंद्र जायभाय यांनी केले.


