पोलीस पाटील भरती करमाळा, माढा प्रक्रीयेला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती —जिल्हाधिकारी सोलापूर यांचे आदेश-देविदास साळुंके
करमाळा प्रतिनिधी
करमाळा, माढा तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिये संबंधी कोंढार चिंचोली चे मा.सरपंच व आर टी आय कार्यकर्ता देविदास आप्पा साळुंके यांनी दि.23/12/2023 रोजी सर्व वरिष्ठ अधिकारी,मा.कक्ष अधिकारी, विभागीय आयुक्त, मा.जिल्हाधिकारी, सोलापूर मा पोलीस अधिक्षक यांना लेखी पत्रे पाठवून सोशल मीडिया, सर्व पत्रकार मंडळी करमाळा, इंदापूर, कर्जत, दौड यांनीही या कामी आवाज उठवला तसेच मा. दत्ता भाऊ मस्के सोलापूर प्रहार अध्यक्ष व सर्व टीम ने काल मा.जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून पोलिस पाटील भरती प्रक्रीया पारदर्शी झाली पाहिजे असा आग्रह धरला आणि मा. जिल्हाधिकारी यांनी पुढील आदेश येईपर्यंत पोलीस पाटील भरती प्रक्रियेला स्तागिती देऊन सदरच्या तोंडी मुलाखती घेऊ नये अशे सांगितले आहे या कामी सामाजिक कार्यकर्ता व आर टी आय कार्यकर्ते मा.श्री देविदास आप्पा साळुंके यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने सर्व गावांचे पोलीस पाटील पदाच्या शर्यतीतील उमेदवारांनी श्री.साळुंके यांना धन्यवाद दिले आहेत पुढील निवड प्रक्रिया पारदर्शी करणेकामी श्री. देविदास आप्पा साळुंके, व मा.श्री दत्ता भाऊ मस्के जिल्हा अध्यक्ष प्रहार संघटना सोलापूर हे संयुक्त जिल्हाधिकारी सोलापूर व वरिष्ठ अधिकारी यांचेकडे कायदेशीर बाजू मांडून प्रयत्न करणार आहेत. पोलीस पाटील भरती संबंधी काही शंका, तक्रारी असल्यास साळुंके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
