राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष पदांसाठी शुक्रवारी सोलापुरात मुलाखती – अभिषेक आव्हाड
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण आणि जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण च्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष सह जिल्हा कार्यकारिणीवर इच्छुक असलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राकेश कामठे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि. 29 डिसेंबर रोजी दु. 2 वा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय सोलापूर येथ घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी दिली. या मुलाखती घेऊन पक्षासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. या मुलाखतीस इच्छुक असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी सोलापूर येथे शुक्रवारी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड व कार्याध्यक्ष अक्षय भांड यांनी केले आहे.
