Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश महिला उपाध्यक्षपदी निवड


करमाळा प्रतिनिधी बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल दिग्विजय बागल यांनी समर्थकांसह मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला असुन रश्मी दिदी बागल यांना पक्षाने महत्वाची जबाबदारी दिली असुन भारतीय जनता पार्टी महिला प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी निवडीचे पत्र घेऊन भारतीय जनता पार्टी मध्ये त्यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. निवडीनंतर रश्मी दीदी बागल म्हणाल्या की भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडून भारतीय जनता पार्टीचे काम चांगल्या पद्धतीने करून पक्ष वाढीसाठी आपण काम करणार आहे. करमाळा तालुक्यामध्ये ‌ बागल गटाच्या माध्यमातून रश्मी दीदी बागल यांनी युवा नेते दिग्विजय बागल यांनी चांगले काम केले असून भाजप पक्ष वाढीसाठी त्यांनी काम करावे त्यांच्या सर्व अडचणी आता कुटुंब म्हणून आम्ही दूर करणार आहोत आता त्यांनी चिंता करण्याची गरज नाही असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टीमध्ये रश्मी दीदी बागल युवा नेते दिग्विजय बागल यांनी भाजपात प्रवेश केला त्यानिमित्ताने ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, रश्मी बागल यांचे पक्षात स्वागत आहे. त्यांचे वडील स्व.दिगंबरराव बागलमामा यांनी सहकारक्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली होती. सर्वसामान्यांकरता करता त्यांनी काम केले. त्यांच्यानंतर रश्मी बागल यांनी त्यांच्या कामाचा वसा घेतला आहे. अतिशय संघर्षाच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. अशा संघर्षाच्या काळात रणजितदादा त्यांच्याबरोबर होते. प्रवेश करताना त्यांनी कोणतीही अट ठेवलेली नाही. पूर्ण विश्वास ठेवला आहे. भाजप हे एक कुटुंब आहे. येथे सर्वजण एकमेकांची काळजी घेतली जाईल. रिटेवाडी उपसासिंचन योजनेतील अडचणी दूर केल्या जातील,भाजप पक्ष वाढीसाठी त्यांनी काम करावे त्यांच्या सर्व अडचणी आता कुटुंब म्हणून आम्ही दूर करणार आहोत आता त्यांनी चिंता करण्याची गरज नाही असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केले. यावेळी करमाळा तालुक्यातील मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, आदिनाथ कारखान्याचे मा. चेअरमन धनंजय डोंगरे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, आदिनाथ कारखान्याचे मा. व्हाइस चेअरमन नानासाहेब लोकरे, मकाई कारखान्याचे संचालक सतीश नीळ, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती चिंतामणी जगताप, मार्केट कमिटीचे संचालक काशिनाथ काकडे, मकाई कारखान्याचे संचालक आशिष गायकवाड, मकाई कारखान्याचे संचालक अनिल अनारसे, पुण्याचे विष्णू गर्जे,कलीम काझी सर, व्यापारी रितेश कटारिया, पोथरेचे नानासाहेब शिंदे, संदिप खटके पाटील करमाळ्यातील आनंदराव कांबळे व विकास भोसले यासह तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group