Uncategorized

दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला NAAC कडून ‘B++’ ग्रेड- प्रा रामदास झोळ

भिगवण  प्रतिनिधी- दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनला NAAC  कडुन B++ ग्रेटची मान्यता मिळाली असल्याचे दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा रामदास झोळसर यांनी सांगितले.दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स फॅकल्टी ऑफ इंजिनिअरींग व फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयास भारतीय उच्च शिक्षण मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NAAC) कडून ‘B++’ ग्रेड मिळाल्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. या ग्रेडच्या प्राप्तीमुळे दत्तकला शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता, विदयार्थी केंद्रित सुविधा, तसेच उत्कृष्ट व्यवस्थापनाची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स हे आपल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्यास वचनबद्ध आहे. NAAC मूल्यांकन प्रक्रियेत संस्थेने शैक्षणिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक विकासाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपली ताकद दाखवली आहे. ‘B++’ ग्रेड हा संस्थेच्या समर्पण, कौशल्य, आणि शिक्षक-विद्यार्थी सहयोगाची पावती आहे. या मूल्यांकन प्रक्रियेत शिक्षण पद्धती, संशोधन व विकास, विद्यार्थी कल्याण, शैक्षणिक साधनसंपत्ती, आणि विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश केला गेला. संस्थेने ‘B++’ ग्रेड प्राप्त करून आपल्या स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा रामदास झोळ यांनी व्यक्त केले.

दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स हे एक ग्रामीण भागातील प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे जे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण, प्रगतीशील सुविधा आणि उत्तम शिक्षकवर्ग उपलब्ध करीत आहे. दत्तकला शिक्षण संस्थेने नेहमीच कालानुरूप आपल्या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये विविध सुधारणा केल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. NAAC कडून आलेल्या टीम ने संस्थेतील डिजिटल वर्ग खोल्या, सुसज्य प्रयोगशाळा, लॅब, आणि उत्कृष्ट संगणक कक्ष, विविध शैक्षणिक क्षेत्रांतील पुस्तकं, जर्नल्स, ई-लायब्रेरी सेवा, आणि संशोधनासाठी आवश्यक संसाधनं, विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक स्वस्थ मिळवण्यासाठी विविध क्रीडा सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, चांगली कॅन्टिन, वेलनेस सेंटर, करियर गाईडन्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संस्थेने सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांसाठी जे विविध समाजसेवी उपक्रम केले आहेत या सर्वांचे टीम कडून कौतुक करण्यात आले.प्राचार्य डॉ. एस ए पाटील, प्रा. श्रीकांत साळुंके, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनतीमुळेच दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सने NAAC कडून ‘B++’ ग्रेड प्राप्त केला आहे. त्यांचे शैक्षणिक, संशोधन आणि प्रशासनात्मक कार्य NAACच्या मूल्यांकन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण ठरले. यामुळे संस्थेचा शैक्षणिक दर्जा राष्ट्रीय स्तरावर गौरवला गेला आहे, आणि संस्थेचा विश्वास आणि प्रतिष्ठा अधिक वाढली आहे असे मत संस्थेच्या सचिव सौ माया झोळ यांनी व्यक्त केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!