कै . साधनादेवी नामदेवराव जगताप मुलींची शाळेच्या शिक्षकांना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आर्सनिक गोळ्याचे वाटप.

करमाळा प्रतिनिधी कोरोना महामारीच्या या संकटकाळामध्ये प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असुन प्रशासनाने दिलेल्या सुचनेचे काटेकोर पालन करुन कोरोनाबरोबरची लढाई घरात राहुन जिंकायची आहे असे मत नगरसेविका सौ स्वातीताई फंड यांनी व्यक़्त केले. कै.साधनाबाई नामदेवराव जगताप मुलींची शाळा नंबर 1 येथे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत व्हावी म्हणून आर्सनिक 100 गोळ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक. दयानंद चौधरी, डॉ.महेशचंद्र वीर , सामाजिक कार्यकर्ते महादेव आण्णा फंड, नगरसेवक अतुल फंड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल फंड यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ.चंद्रकला टांगडे,सौ.सुवर्णा वेळापुरे,सौ.सुनीता क्षिरसागर, श्री रमेश नामदेसर,सौ.मोनिका चौधरी,सौ.पुनम नरूटे,श्रीमती तृप्ती बेडकुते,श्रीमती जस्मीन शेख,सौ.सुजाता घोगरे यांना आर्सनीक 100 होमॅपॅथिक गोळ्याचे वाटप करण्यात आले असुन. सर्व शिक्षकांनी आपली व आपल्या कुटुंबातील लोकांची काळजी घेण्याचे आवाहन नगरसेविका. सौ स्वातीताई फंड यांनी केले आहे.
