श्री कमलाभवानी मंदिर जतन व संवर्धनासाठी ग्रामपंचायत देवीचामाळ यांच्याकडून श्रीकमलादेवी नवरात्र उत्सवानिमित्त यात्रा इतर करामधुन मिळालेले साडे चार लाख देणगी श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टकडे सुपृद
करमाळा प्रतिनिधी *श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर* ट्रस्ट च्या संयोजकाने श्रीकमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून कामास सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून ट्रस्ट चे अध्यक्ष सोमनाथ चिवटे सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्त यांनी मदतीचे आवाहन भक्तांकडे केले होते. या आव्हानास प्रतिसाद म्हणून ग्रामपंचायत देवीचा माळ यांनीश्रीकमलादेवी नवरात्र उत्सव निमित्त पाळणे व यात्रेतील इतर कर यामधून श्री देवीचामाळ येथील श्री प्रविण बाबुराव हिरगुडे यांनी पाळणे व इतर कराच्या रकमेतून रुपये ४,५०,०००|~ (चार लाख पन्नास हजार फक्त ) विश्वस्तांकडे दिनांक १४..१०..२०२४. सोमवार रोजी देणगी मंदिर जतन आणि संवर्धन कामास प्राप्त झाली आहे. यावर्षी हा ऐतिहासिक असा निर्णय झालेला आहे.
या निमित्त त्यांचा सत्कार श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून श्री.सोमनाथ चिवटे अध्यक्ष श्री अनिल पाटील सचिव श्री सुशील राठोड विश्वस्त श्री राजेन्द्र वाशिंबेकर विश्वस्त वअशोक गाठे. व्यवस्थापक यांनी सत्कार केला . यावेळी श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायत सरपंच सौ रेणुका सिद्धेश्वर सोरटे, उपसरपंच सचिन शिंदे, तसेच ग्रामपंचायत सदस्य संतोष पवार , प्रभाकर फलफले , जयराम सोरटे , महेश सोरटे , दिपक थोरबोले ,प्रभाकर सोरटे ,तंटामुक्ती अध्यक्ष सचिन चोरमुले, श्रीराम फलफले , अंगद बिडवे, सिद्धेश्वर सोरटे , दत्तात्रेय जाधव ग्रामपंचायत श्रीदेवीचा ग्रामपंचायत अधिकारी ,रोहीत सोरटे, बापु चांदगुडे, आप्पासाहेब अनभुले ,अभिषेक चव्हाण, बिभिषण फलफले, आकाश सोरटे ,अभिजीत कामटे, जितेंद्र पवार ,अविनाश सावंत ,रोहण पवार , प्रशांत सोरटे यांचा सत्कार श्री जगदंबा कमलादेवी मंदिर समितीकडून करण्यात आला.
यावेळी भक्त व श्रीदेवीचा माळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .श्रीकमलाभवानी मंदीर जीर्णध्दाराच्या कामासाठी भाविकां नी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील ट्रस्ट च्या माध्यमातून करण्यात आले आहे.
तसेच ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे.संपर्क अशोक गाठे मो. नंबर ९४०४७०८९२४
