Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांना मराठा सेवा संघ करमाळा यांच्यावतीने मराठा मित्र पुरस्कार प्रदान*

करमाळा प्रतिनिधी मराठा समाज सेवा संघाच्या ३४ या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रामध्ये ‌‌ उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तपस्वी प्रतिष्ठानचे ‌ अध्यक्ष श्रेणिक शेठ खाटेर यांना मराठा मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
या पुस्तकाचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मराठा सेवा संघाचे केंद्रीय सदस्य उत्तमराव माने नगरसेवक किरण घाडगे
यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील, शेतकरी कामगार संघर्षनेचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे , टायगर ग्रुपचे अध्यक्ष डॉ.तानाजी भाऊ जाधव,गटविकास अधिकारी मनोज राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उद्योजक भरत भाऊ आवताडे मा. जिल्हा परिषद सदस्या सौ राणीताई वारे तालुका अध्यक्ष सचिन काळे, आदी मान्यवराच्या उपस्थितीत ‌ हा पुरस्कार देण्यात आला.सामाजिक कार्यकर्ते तपश्री प्रतिष्ठान दिव्यरत्न गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष श्रेणिकशेठ खाटेर यांनी संघर्षमय जीवनातून यशस्वी वाटचाल करत उद्योजक, समाजसेवक ते कुशल राजकारणी असा यशस्वी प्रवास केला आहे. स्वतःच्या मालकीची कोट्यावधी रुपयाची जमीन आई वडील यांच्या नावाने धर्मकार्यास दान देऊन गोशाळेची स्थापना करुन गोसेवेचे महान कार्य करणारे करमाळा तालुक्यात आध्यात्मिक क्षेत्रात योगदान देऊन भागवत कथा, शिवपुराण कथा, श्रीराम कथेचे भव्यदिव्य आयोजन करणारे, कोरोना महामारीमध्येही नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी मोफत ऑक्सिजन पुरवठा करून रुग्णांना भोजनाची सोय करून रुग्ण सेवा करणारे, आजपर्यंत ५००० रुग्णांच्या मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणारे श्रेणिकशेठ खाटेर यांनी करमाळा तालुक्यामध्ये आपल्या सामाजिक कार्याद्वारे समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे.समाज कल्याणकारी सदैव कार्यरत असणारे दातृत्वाच्या भुमिकेतुन समाजाला मदत करणारे श्रेणिक शेठ खाटेर यांना मराठा सेवा संघाचा मराठा मित्र पुरस्कार मिळाला त्याबद्दल शैक्षणिक सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group