करमाळा

पारेवाडी रेल्वे स्टेशनवर आचारसंहिते पुर्वी एक्सप्रेस गाडी थांबणार का? रेल-रोको न करण्याचे खासदार निंबाळकरांचे आवाहन


करमाळा प्रतिनिधी- मध्य रेल्वेच्या पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीच्या थांब्यासाठी रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक असुन, शनिवार दिनांक-९/०३/२०२४ रोजी दुपारी ४ वाजता रेल रोको आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे. यावरून खासदार निंबाळकर यांना सदरचे काम आचारसंहिते पुर्वी मार्गी लावण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. याबाबत खासदार निंबाळकर यांनी रेल्वे बोर्डाकडे ही मागणी पूर्ण करण्यासाठी कंबर कसली असुन पारेवाडी रेल्वे स्थानकावर गाडीचा थांबा देणारच याबाबत ठाम भुमिका घेतली आहे. आज पारेवाडी रेस्टे प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी ग्रामस्थ यांना भ्रमणध्वनी द्वारे त्यांनी संपर्क साधला असुन १४ तारखेच्या आधी गाडीचा स्टॉप मिळेल असा विश्वास दिला आहे. येथील प्रवाशांनी व शेजारील१५ गावचे लोकांनी रेल्वे रोको सह लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असुन, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांचे आवाहना प्रमाणे उदयाचा होणारा रेल रोको होणार का नाही? हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. खासदार निंबाळकर यांचे आवाहनाला एकदा प्रतिसाद देऊ आणि जर गाडीचा थांबा झाला नाही तर मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईलच परंतु भव्य रेल रोको ,चक्का जाम आंदोलन छेडण्यात येईल अशाही प्रतिक्रीया येत आहेत. तर अभी नही तो कभी नही असे म्हणत काही जण रेले रोको आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खासदार निंबाळकर यांचे विश्वासपूर्ण आवाहनाला प्रतिसाद मिळतो का, रेल्वे रोको आंदोलन होणार.. हे अद्याप स्पष्ट नाही. रेल्वे विभागाचे अधिकारी यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती ची पहाणी केली आहे.
*आमची मागणी तातडीने पुर्ण करा- आम्हाला काय रेल रोको करायची हौस नाही- कैलास निसळ( व्यापारी)*

*खासदारांचे आवाहनाला प्रतिसाद द्यावा, जर गाडी थांबली नाही तर मतदानावर बहिष्कार घालावा.- शिवसेना नेते सुर्यकांत भाऊ पाटील*

*अभी नही तो कभी नही, आम्ही नाश्ता पाण्याची सोय करतो पण रेल रोको करावाच- जयकुमार बाठीया*

*खासदारांचे आवाहनाला एकदा प्रतिसाद द्यावा अन्यथा मतदानावर बहिष्कार कायम करावा- राजेंद्रसिंह पाटील*

*माननीय खासदार महोदय यांचे प्रयत्न चालु आहेत, आचारसंहीते पुर्वी निर्णय केल्यास खासदारांची घोड्यावरून मिरवणूक काढु- ॲड. अजित विघ्ने.*

*नऊ तारखेला दोन वाजेपर्यंत वाट पहा , पत्र घ्या अन्यथा रेल रोको- सर्जेराव राऊत.*

*गाडीचा थांबा दिला तर ठिक अन्यथा बहिष्कारा वर ठाम- सरपंच सचिन वेळेकर*

*पारेवाडी रे स्टे वर गाडीचा थांबा दिल्यास उदयोग धंदे वाढीला चालना आणि प्रवाशांची गैरसोय दुर होऊन, गोर गरीबांची मुले पुणे मुंबईपर्यंत जाऊन शिक्षण घेतील.- उदय पाटील                        रेल्वे विभागाने प्रवाशांचे मागणीचा अंत पाहु नये-अतुल राऊत जनसेवा खासदारसाहेब रेल्वे थांब्याची मागणी पुर्ण करावी, विश्वासही ठेवतो पण काम न झाल्यास बहिष्काराचा निर्णय ठाम*- केत्तुर, पारेवाडी, पोमलवाडी, खातगाव, देलवडी, हिंगणी, भगतवाडी/ गुलमरवाडी, गोयेगाव, राजुरी, रिटेवाडी , दिवेगव्हाण गावांनी केले ठराव संमत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!