करमाळा येथे शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री. मा. उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महिला आघाडी व युवा सेना यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम
करमाळा प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथील शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड व युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. यावेळी शिवसेना महिला आघाडी व युवा सेनेच्या पदाधिकारी यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांनी त्यांचा वाढदिवस हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रम घेवून साजरा करावा असे तमाम शिवसैनिकांना आदेशीत केले होते.

त्यानुसार करमाळा येथील किल्ला विभाग येथे महिलांना कोरोना विषयक जनजागृतीपर डॉ. स्वाती अमोल घाडगे यांचे मार्गदर्शनपर शिबीर आयोजित केले होते. सदर शिबिरामध्ये मा.डॉ. सौ. स्वाती घाडगे यांनी उपस्थित महिलांना कोरोना रोगापासून कशापद्धतीने सावधगिरी बाळगावी, कोणत्या उपाययोजना कराव्यात अनमोल मार्गदर्शन केले.तसेच नागरिकांमध्ये कोरोना रोगाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार व्हावी. या करिता केंद्रीय आयुष मंत्रालयाने जारी केलेल्या आर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्या व मास्क चे वाटप जेष्ठ पत्रकार नासीर कबीर यांच्या हस्ते व तालुका संपर्क प्रमुख बापू मोरे यांच्या उपस्थितीत व तरटगावचे सरपंच डॉ. अमोल घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करून घरोघरी गोळ्या व मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी युवा सेना उपतालुका दादासाहेब तनपुरे, उपशहर प्रमुख अविनाश भिसे, शाखा प्रमुख अभिजीत सुरवसे, नवनाथ कदम, वासुदेव ढोके, अभिजीत शेलार, आदी शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.
