Sunday, September 20, 2026
Latest:
करमाळा

करमाळा तालुक्यातील रावगावचे सुपुत्र रामदास कांबळे यांना “राष्ट्रीय समाज भूषण” पुरस्कार प्रदान*


करमाळा (प्रतिनिधी) – रावगाव ता. करमाळा येथील प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामदास कांबळे यांना माहेर सेवाभावी संस्था पारनेर यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पद्मविभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने राळेगणसिद्धी येथे सन्मानित करण्यात आले .यावेळी कांबळे बोलताना म्हणाले की जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते मिळालेला हा सन्मान म्हणजे माझ्यासाठी खूप दुर्मिळ क्षण आहे आम्ही प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवितो व भविष्यात देखील खूप चांगल्या समाज उपयोगी संकल्पना आम्ही राबविण्याचा प्रयत्न करणार आहोत. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संस्थेचे अध्यक्षा सौ. सुप्रिया मंडलिक सचिव सचिन मंडलिक प्रा. डॉ. सुभाष गायकवाड माऊली शिक्षण संस्थेचे अनिकेत पठारे साहित्यिक प्रा. विजय लोंढे फार्मसी कॉलेज शिरूरचे प्राचार्य डॉ. अमोल शहा झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजू हिवरे, ईगल फाउंडेशनचे नवनाथ मोरे उद्योजक राजेंद्र गायकवाड आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!