फिसरे गावाच्या शाश्वत विकासासाठी एकसंघ रहावे- मा.विलासरावजी घुमरे सर
फिसरे प्रतिनिधी
करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर व फिसरे ग्रामपंचायत फिसरे यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा ध्यास… ग्राम व शहर विकास… हे ब्रीदवाक्य घेऊन विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव मा.विलासरावजी घुमरे सर यांनी फिसरे गावच्या शाश्वत विकासासाठी एकसंघ रहावे असे आवाहन केले. आपले सर्व मतभेद बाजूला ठेवून सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावाचा विकास करावा. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो त्यासाठी स्वयंसेवकांनी या संधीचा फायदा घेऊन आपला व्यक्तिमत्व विकास करावा असेही सांगितले.
तसेच तहसीलदार साहेबांचे प्रतिनिधी गायकवाड साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावाच्या विकासासाठी तहसीलमध्ये येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल बी पाटील यांनी गावातील युवकांचा उत्साह पाहून त्यांचे अभिनंदन केले व स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या.संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांनी ग्रामस्थांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा व आपले आरोग्य जपावे हा मोलाचा संदेश दिला. यावेळी माजी उपसरपंच संदीप नेटके, उद्योजक भरत अवताडे पाणी फाउंडेशन चे आशिष लाड व एन.एस.एस.प्रतिनिधी म्हणून कुमारी ऐश्वर्या आरणे यांनी आपली मनोगतं व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. मुन्नेश जाधव यांनी केले व आभार सौ.सुजाता भोरे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी विद्या विकास मंडळाचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, तहसीलचे गोसावी साहेब,पाणी फाउंडेशनचे प्रदीप गुरव,फिसरे गावचे सरपंच प्रदीप दौंडे उपसरपंच विजय आवताडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, केवारे भाऊसाहेब,जिल्हा परिषद शाळेचे डमाले सर , त्यांचे विद्यार्थी,शिवराज प्रतिष्ठानचे सर्व सदस्य,यशवंत परिवाराचे सर्व सदस्य, ग्रामस्थ व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
