Monday, April 21, 2025
Latest:
आध्यात्मिककरमाळासकारात्मक

श्री कमलादेवी मंदिरास पुष्प सजावट केल्याबद्दल मंगेश गोडसे यांचा सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री कमला भवानी मंदिर येथे आज पुष्प सजावट करण्याची मला संधी मिळाली येथून पुढे प्रत्येक नवरात्रीच्या शेवटच्या माळेला अत्यंत आकर्षक पुष्प सजावट करू असा विश्वास मंगेश गोडसे यांनी व्यक्त केला मंगेश गोडसे यांचा कमलादेवी भक्तगणांचे वतीने व करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला मंगेश गोडसे हे कमला देवीचे प्रचंड भक्त असून त्यांनी स्वखर्चातून जवळपास एक हजार किलो झेंडूची फुले वापरून तसेच गुलाब जर बिया शेवंती अशा फुलांचा वापर करून आपल्या जवळपास वीस कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कमलादेवी मंदिरातला पुष्प सजावट केली होती यावेळी देवीचामाळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दादा पुजारी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे अशोक नरसाळे नासिर कबीर सचिन जव्हेरी दिनेश मडके सिद्धार्थ वाघमारे निलेश चव्हाण नागेश शेंडगे व्यवस्थापक अशोक गाठे उपस्थित होते शाल-श्रीफळ देवीच्या प्रतिमेची प्रतिकृती देऊन मंगेश गोडसे यांचा सत्कार करण्यात आला ही सजावट ओंकार राऊत रोहित पवार आकाश गरड सागर जाधव समाधान गोळे सागर गोळे यांचाही सत्कार करण्यात आला ही सजावट करण्यासाठी जवळपास अंदाजे एक लाख रुपये खर्च आला असून कोरोना योद्धा ही फुलातून काढलेली प्रतिमा आकर्षणाचे केंद्र ठरले होते यावेळी समाज ग्रामपंचायतीच्या वतीने दादा पुजारी सर कमलाभवानी देवी ट्रस्टच्या वतीने व्यवस्थापक अशोक गाठे यांनी गोडसे यांचा सत्कार केला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group