करमाळा- माढा विधानसभेच्या निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल तालुकाध्यक्ष गणेश चिवटेचा भाजपच्यावतीने सत्कार
करमाळा प्रतिनिधी – भाजपाचे तालुका अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री गणेश चिवटे यांची भारतीय जनता पार्टी २४४ करमाळा- माढा विधानसभेच्या निवडणूक प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी सत्काराला उत्तर देताना गणेश चिवटे म्हणाले की भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जि माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे, ती यशस्वीपणे पार पाडत करमाळा विधानसभेची पक्ष बांधणी मजबूत करून येणाऱ्या 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारास भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करूयात असे मत व्यक्त केले,
यावेळी तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव ,बिटरगावचे सरपंच डॉ. अभिजीत मुरूमकर, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, नितीन झिंजाडे ,धर्मराज नाळे ,नानासाहेब अनारसे, गणेश महाडिक, जयंत काळे पाटील,संजय किरवे, दादा गाडे, सचिन ढाणे, दत्तात्रय भुजबळ, विनोद इंदलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
