Tuesday, January 14, 2025
Latest:
करमाळा

करमाळा मतदार संघातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी मकरसंक्रांत सणाच्या शुभमुहर्तावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट*


करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील विविध मंजुर विकासकामा संदर्भात व प्रस्तावित कामांचे मंजुरी बाबत आज देवगिरी निवासस्थान मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांची मकरसंक्रांत निमित्ताने करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांनी भेट घेऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे प्रयत्नातुन मंजुर असलेल्या कुगाव ते शिरसोडी,डिकसळ पुल,हॅम मधील राशीन बॉर्डर ते वेणेगाव व जातेगाव-टेंभुर्णी व तसेच करमाळा तालुक्यांतील विविध विकासकामांना गती देणे तसेच करमाळा तालुक्यात माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे माध्यमातुन प्रलंबित विकास कामे मार्गी लागणेचे संदर्भात चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी विधानसभेत संजयमामाच्या झालेल्या पराभवा बद्दल माननीय अजितदादांनी खंत व्यक्त केली.लवकरच पक्षाचे अधिवेशन शिर्डी येथे होत असुन त्यावेळी पक्षाचे ध्येय धोरण जाहीर करणार आहोत. करमाळा तालुक्यातील विकासकामांना निश्चितपणे गती देण्याचे काम होईल असे पदाधिकाऱ्यांना आश्वासित करण्यात आले आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बाळकृष्ण सोनवणे,राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीचे ता.अध्यक्ष भरत अवताडे,राष्ट्रवादी युवक कॅाग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड,राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीचे ता.प्रवक्ते ॲड.अजित विघ्ने,राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष आशपाक जमादार,राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष ॲड. नितीनराजे राजेभोसले,टाकळीचे माजी सरपंच ता.उपाध्यक्ष गोरख गुळवे,सोलापुर जिल्हा दुध संघाचे संचालक राजेंद्रसिंह(अशोक)पाटील,हिंगणीचे राजेंद्र बाबर,राष्ट्रवादी युवक कॅाग्रेसचे राजेंद्र सुर्यवंशी,सतिश पवार,सचिन वेळेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!