ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती विद्यार्थिनीच्या हस्ते उत्साहात साजरी*
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी काही मुलींनी जिजाऊ यांची भूमिका सादर केली.तसेच आजच्या जयंती निमित्त काही मुलींनी व महिला शिक्षकांनी पुष्पहार घालून पूजा केली.यावेळी करण सरडे, कुंजन चोरमले, सार्थक घोगरे, संभू रणशिंग, विश्वजीत झगडे, सिद्धेश्वर गोडगे, आदित्य पोळ, रिद्धी मोरे सिद्धी मोरे अनुजा राठोड सृष्टी सरडे आणि कोयल परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.