आज करमाळयात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवारसाहेब यांची जाहिर सभा माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा जाहिर प्रवेश
करमाळा प्रतिनिधी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ. शुक्रवार दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत, या प्रचार सभेत करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश करणार आहेत, ही सभा करमाळा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान करमाळा येथे होणार आहे.
या सभेसाठी करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे. जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष, तसेच सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन कार्यकर्ते तसेच माढा तालुक्यातील काही कार्यकर्ते यावेळी जाहीर प्रवेश करणार या सभेसाठी खुद्द शरद पवार उपस्थित. या सभेसाठी खुद्द शरद पवार उपस्थित राहणार असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण करमाळा तालुक्याचे या सभेकडे लक्ष लागले आहे.
