देवळालीसाठी रोज पाच टँकर मंजूर शिवसेना तालुका अध्यक्ष राहुल कानगुडे यांच्या प्रयत्नाने पाण्याची समस्या सुटली
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहराला लगत असलेल्या देवळाली खडकेवाडी सह वाड्यावर प्रचंड पाण्याची टंचाई होतीपिण्याच्या पाण्याचे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.यासाठी शिवसेना तालुका अध्यक्ष राहुल कानगुडे यांनी उपजिल्हाधिकारी प्रियंका आंबेकर यांना निवेदन देऊन स्वतः पाणी टँकरचे प्रस्ताव कुर्डूवाडी कार्यालयात जाऊन दाखल केले होतेशिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी या प्रश्न उपजिल्हाधिकारी प्रियंका आंबेकर यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करून हे टँकर मंजूर करून घेतले.24 हजार लिटर क्षमतेचे अडीच टँकरव बारा हजार लिटरचे दोन टँकरअसे मिळून दररोज 84 हजार लिटर पाणी उद्यापासून देवळाली गावात शासनाच्या वतीने देण्याचे आदेश प्रांत अधिकारी यांनी दिली आहे.याबाबत बोलताना राहुल कानगुडे म्हणाले की देवळाली ग्रामपंचायतीने वेळेवर प्रस्ताव दाखल केला नव्हता मी स्वतः पाठपुरावा करून प्रस्ताव दाखल केला यामुळे आज टँकर सुरू होत आहेत ग्रामपंचायतीने गांभीर्याने याची दखल घेऊन पाठपुरावा केला असता तर एक महिन्यापूर्वीच टँकर सुरू झाले असते सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्यामुळे देवळाली ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला.
++–मनोज राऊत गटविकास अधिकारी करमाळा
देवळाली येथे पाण्याची टँकर सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाले असून उद्यापासून देवळाली इथे पाण्याची टँकर सुरू करीत आहोत
