कोर्टी विज उपकेंद्रांमध्ये राजुरी साठी स्वतंत्र फिडर बसवण्याची राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष तृप्ती साखरे-सरोदे यांची मागणी

राजुरी प्रतिनिधी राजुरी गावातील विजेचा वाढता वापर व ओलिताखाली येत असलेले वाढत जाणारे क्षेत्र याचा विचार करता राजुरीतील लोकांना नेहमी विजेच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पारेवाडी व कोर्टी येथील वीज उपकेंद्रातून मिळणारी वीज नेहमी अनियमित व कमी दाबाने मिळत आहे यावर पर्याय म्हणून कोर्टी येथील वीज उपकेंद्रा मध्ये राजुरी साठी स्वतंत्र फिडर बसवून हा प्रश्न सोडवावा व हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी राजुरी येथे स्वतंत्र सब स्टेशन मंजूर करावे अशी मागणी सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या उपाध्यक्ष सौ तृप्ती साखरे सरोदे व युवक कार्यकर्ते श्री श्रीकांत साखरे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदनही त्यांनी समक्ष भेटून माननीय पालकमंत्री यांना दिले आहे.कोर्टी येथे स्वतंत्र फिडर बसवला तर राजुरीच्या विजेचा फार मोठा प्रश्न सुटेल असेही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
