धनगर समाजाची अनेक दिवसाची मागणी अखेर मान्य,अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर,राज्य सरकारचे आभार :- विनोद महानवर
करमाळा प्रतिनिधी:- अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची धनगर समाजाची अनेक दिवसाची मागणी अखेर मान्य झाली आहे.राज्य सरकारने काल याबाबत शासन आदेश जारी करत अहमदनगर चे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केले आहे.याबद्दल राज्य सरकारचे धनगर समाजाच्या वतीने आभार व्यक्त करत असलेचे मत धनगर समाजाचे नेते तथा भाजपचे जिल्हा चिटणीस विनोद महानवर यांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना महानवर म्हणाले की,जुलमी राजसत्ता असलेली अहमदनगरचे नाव बदलून याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर ठेवणे म्हणजेच महाराणी अहिल्यादेविंच्या कार्याचा गौरव राज्य सरकारने केला आहे. ही बाब एक धनगर समाजासाठी व मी एक प्रतिनिधी म्हणून अभिमानास्पद आहे.हा निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आमदार गोपीचंद पडळकर,आमदार राम शिंदे,खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह सर्वच धनगर नेते कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार श्री महानवर यांनी व्यक्त केले आहेत.
