खासदार रणजीतसिंह नाईक नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीचे शिवसेनेकडून स्वागत-महेश दादा चिवटे जिल्हा प्रमुख
करमाळा प्रतिनिधी
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढा मतदार संघातून मिळालेली उमेदवारी योग्य असून या उमेदवारीचे माढा लोकसभा शिवसेनेच्या वतीने स्वागत करीत असल्याची माहिती जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रंजीचे नाईक निंबाळकर यांनी सातत्याने गेली पाच वर्षापासून ठेवलेला जनसंपर्क विकास कामासाठी दिलेले योगदान व सर्व शिवसैनिकांना दिलेले मानाचे स्थान यामुळे सर्व शिवसैनिक मनापासून काम करणार असून किमान दीड लाख मताने रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी होतील असा विश्वास जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केला आहे.तालुक्यातील महत्वकांक्षी रिटेवाडी उपसा सिंचन योजना उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी खासदार प्रयत्न करत आहेत संवेदनशील मुख्यमंत्री यांनी याला मान्यता दिली आहे.याशिवाय करमाळा तालुक्यातील रेल्वे स्टेशनचा झालेला विकास रेल्वेने ठिकाणी मिळालेले थांबेयाशिवाय जातेगाव टेंभुर्णी या मार्गासाठी 935 कोटी रुपयांचा मिळाला केंद्राचा निधी यास अनेक विकास कामे खासदारांची नाईक निंबाळकर साठी सकारात्मक बाब आहे.याशिवाय आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला कर्ज पुनर्गठन करण्यासाठी शासकीय हमी देण्यासाठी खासदार निंबाळकर यांनी शब्द दिला आहेया विभागातील करमाळा माढा माळशिरस सांगोला या भागातील सर्व शिवसैनिकांनी सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी द्यावी अशी शिफारस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
