करमाळा तहसील कार्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळायुनिट च्या वतीने 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
करमाळा तहसिल कार्यालयात महसूल प्रशासन व अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळायुनिट च्या वतीने आज 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार मा. समीर माने साहेब यांनी भूषविले. प्रास्ताविक मंडळ अधिकारी मा. संतोष गोसावी यांनी केले.
यावेळी सोलापूर जिल्हा कोषाध्यक्ष मा. सचिन साखरे माधुरी ताई परदेशी रेखा परदेशी करमाळा तालुका अध्यक्ष मा. ॲड शशिकांत नरुटे इ. नी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विचार व्यक्त केले.
यावेळी मा.तहसीलदार साहेब समीरजी माने साहेब गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब यांनी ग्राहक कायद्या विषय सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी तहसीलदार मा. समीर माने साहेब गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब महसूल नायब तहसीलदार मा. बदे साहेब पुरवठा अधिकारी मा. हनुमंत जाधव साहेब पुरवठा निरीक्षक मा. बडकुंभे साहेब पुरवठा विभागातील मा अरगनुरकर साहेब मंडळाधिकारी मा. दादासाहेब गायकवाड मंडळाधिकारी मा. संतोष गोसावी अखिल भारतीय ग्राहक पंचायत सोलापूर जिल्हा कोषाध्यक्ष मा सचिन साखरे सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख मा. माधुरी ताई परदेशी करमाळा तालुका अध्यक्ष ॲड शशिकांत नरुटे तालुका सचिव मा. संजय हंडे तालुका सदस्य मा. अजिम खान मा. अनिल शिंदे मा. संभाजी कोळेकर महिला आघाडी सदस्या मा. मंजिरी ताई जोशी, ललिता ताई वांगडे, सारीका ताई पुराणिक निशीगंधा शेंडे इ. उपस्थित होते.या प्रसंगी करमाळा तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे कार्यालय प्रमुख तथा प्रतिनिधी तसेच स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाधिकारी गायकवाड साहेब यांनी केले. शेवटी आभार महसूल नायब तहसीलदार बदे साहेब यांनी मांडले.
