करमाळाक्राईम

करमाळा तालुक्यात 2017 पासुन फरारी आरोपी पकडला: दोन दिवस पोलिस कोठडी

करमाळा प्रतिनिधी
करमाळा पोलिसांनी गेल्या 2017 -18 पासून खून करून दरोडा प्रकरणी फरार असलेल्या आरोपीस सापळा रचून जिंती येथे भरचौकात मुसक्या आवळल्या . श्रीमंगल ज्ञानदेव काळे वय 38 रा भगतवाडी तालुका करमाळा असे या पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे या आरोपीस करमाळा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एखे यांच्यासमोर उभे केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबतची हकीकत अशी की संशयित आरोपी श्रीमंगल काळे हा जिंती येथे आल्याची खबर करमाळा पोलिसांना खब-या मार्फत मिळाली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासुन वेष बदलून पोलिस जिंती परिसरात दबा धरून बसले होते. जिंती बाजारात तो महिलासह जात असताना पोलिसांनी त्याला झडप घालून पकडले.यावेळी त्यांने पोलिसाबरोबर झटापट करून त्यांने सुटण्यासाठी प्रयत्न केला.गावक-यानीही बघ्याची भूमिका घेतली. तब्बल अर्धा तास झटापट झाली मात्र करमाळा पोलिसांनी त्याला जेरबंद केले. ही कामगिरी पोलिस निरिक्षक ज्योतीराम गुजंवटे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत ढवळे, अमोल जगताप, सोमनाथ जगताप, अजित उबाळे, भोजणे आदिनी केली.या संशयित आरोपीं कडून घरफोडी , दरोडे सारखे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे घरफोडी करून एकाचा खून करून श्रीमंगल हा फरार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तो बारामती, कर्जत , श्रीगोदा,करमाळा आदि ठिकाणच्या गुन्ह्यात तो संशयित आरोपी आहे.त्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
याचा तपास पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुजंवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष देवकर हे करत आहेत.
**

error: Don\'t try to copy. Content is protected !!