राज्यपाल भगतसिंह कोशारीविषयी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपली भुमिका जाहीर करावी- सुनील बापु सावंत नेते सावंत गट
प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी महाराष्ट्रातील महापुरुषाबद्ल विशेषता छत्रपती शिवाजी महाराजाबद्ल अपशब्द काढुन सर्व शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या आहे याबद्ल संपुर्ण राज्यात बंद ठेवण्यात आला होता मोर्चे काढण्यात आले होते हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने राज्यपाल हटाव साठी आवाज उठविला होता परन्तु राज्यपालाच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी व शिंदे गट असल्यामुळे विरोधी गटाच्या मागणी कड़े दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसुन येत आहे महाराष्ट्राचा अभिमान तसेच रयतेचे राजे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवछत्रपतींचा अवमान राज्यपाल करतात त्यांचा अवमान म्हणजे संपूर्ण रयतेतील जनतेचा हा अवमान आहे तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी उद्या होणाऱ्या 25 डिसेंबर रोजी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमात आपली भूमिका स्पष्ट करावी तेव्हा संपूर्ण राज्यातील जनता आपणास कधीही माफ करणार नाही आम्ही आपल्या भूमिकेकडे लक्ष वेधून आहे अशी मागणी करमाळा तालुक्यातील शिवप्रेमी जनतेने केली आहे शिवछत्रपती यांच्या बद्दल राज्यपाल आज बिनधास्तपणे बोलतात
या विषयी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शि्ंदे साहेब यांनी अद्याप पर्यंत आपली भुमिका स्पष्ट केलेली दिसुन येत नाही त्यामुळे मुख्यमंत्री नी आपली भुमिका स्पष्ट करण्याची मागणी तसेच करमाळा येथील शिवप्रेमींनी राज्यपाल विरोधात आंदोलन केल्यामुळे उलट पक्षी एकूण 18 आंदोलन कर्त्यावर गुन्हे दाखल झाले आहे सदरचे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे अशी मागणी ही श्री सावंत यांनी सर्व शिवप्रेमीच्या वतीने केली आहे.
