Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडीराजकीयसंशोधनसोलापूर जिल्हासोलापूर शहर

इ.१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाचा दिलासा.

करमाळा प्रतिनिधी:

व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र शासन सीईटी प्रवेश परीक्षा ही पीसीएम व पीसीबी या दोन ग्रुप साठी दोन टप्यात घेत आहे.परंतु, या परीक्षेसाठी कोरोना,पाऊस व पॉवर आऊटेज अश्या कारणामुळे या सीईटी परीक्षेसाठी सर्व साधारण ४०% विद्यार्थी उपस्थित नव्हते व सिईटी परीक्षा चालू असताना प्रवेश पात्रता ही महाराष्ट्र सरकारणे कमी केली ह्या सर्व गोष्टी सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, प्रवेश नियामक प्राधिकरण व महाराष्ट्र शासन यांच्या लक्षात आणून देण्याचे काम असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन ऐडेड इन्स्टिट्यूट इन रूरल एरिया चे अध्यक्ष प्रा.रामदासजी झोळ यांनी केले व यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.उदयजी सामंत व संबंधित विभागांना दि.१३.१०.२०२० रोजी पत्रव्यवहार केला.मा.मंत्री उदयजी सामंत सो यांनी सकारात्मक निर्णय घेऊन लगेचच काल दि.२१.१०.२०२० रोजी परिपत्रक काढून अनुपस्थित विद्यार्थ्यांना एक संधी देण्याचे काम केले आहे.याबाबत २२ ऑक्टोबर २०२० व २३ ऑक्टोबर २०२० अश्या दोन दिवसामध्ये परीक्षेस अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी १०० रुपये भरून आपले हॉल तिकीट डाउनलोड करावे, याप्रकारे अनुपस्थित विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात आली आहे,याप्रकारे संघटनेच्या यशामध्ये भर पडली आहे .महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये या निर्णयामुळे उत्साहाचे वतावरण निर्माण झाले आहे त्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.उदयजी सामंत सो व सीईटी सेल यांचे आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group