राजुरीची कन्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश संघटकपदी सौ.तृप्ती अजय सरोदे यांच्या निवडीचे करमाळा तालुक्यात स्वागत*
करमाळा प्रतिनिधी राजुरी गावची कन्या सौ तृप्ती अजय सरोदे यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश संघटकपदी निवड करण्यात आली आहे त्यांची निवड प्रदेशाध्यक्ष सौ. रूपालीताई चाकणकर यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थिती असताना आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आपल्या कार्याचा ठसा उमटून तृप्ती साखरे यांनी राज्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची पद मिळवली आहे. कार्यकर्ता ते प्रदेश संघटक असा त्यांचा संघर्ष यशस्वी प्रवास आहे. करमाळा तालुक्यातील राजुरी सारख्या एका खेड्या गावातील मुलगी राज्याच्या राजकारणात संघटक सचिव पदी निवड होणे हे करमाळा तालुक्याच्या दृष्टिकोनातून अभिमानाची बाब आहे त्यांच्या या निवडीचे स्वागत अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक करमाळा तालुका अध्यक्ष क्लासिक आईल कंपनीचे मालक संतोष काका कुलकर्णी यांनी केल्या असून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत
