सर्वसामान्य नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात सदैव तत्पर राहून काँग्रेस पक्ष वाढीसाठी कार्यरत राहणार-साहेबराव वाघमारे
करमाळा प्रतिनिधी- सर्वसामान्य नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात सदैव तत्पर राहून काँग्रेस पक्ष वाढीसाठी कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन करमाळा विधानसभा मतदारसंघाचे युवक काँग्रेस( आय )चे नूतन अध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी व्यक्त केले.
आज काँग्रेस युवक प्रदेश अध्यक्ष. शिवराज मोरे साहेब यांच्या आदेशा नुसार तसेच सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.सुनंजयदादा पवार यांच्या सूचनेनुसार करमाळा तालुका काँग्रेस( आय)चे ब्लॉक अध्यक्ष प्रतापराव नामदेवरावजी जगताप यांच्या प्रमुख उपस्थितत करमाळा येथील जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृहात श्री साहेबराव वाघमारे यांची करमाळा तालुका विधानसभा युवक काँग्रेस (आय) अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदर निवडीचे अधिकृत पत्र तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्या शुभहस्ते करमाळा तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, हितचिंतक मित्र परिवार यांच्या उपस्थित देण्यात आले. यावेळेस करमाळा तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी पोपळज तालुका करमाळा येथील श्री संभाजी मच्छिंद्र शिंदे यांची ही निवड करण्यात आली. नूतन युवक तालुकाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,महाराष्ट्र राज्यात आगामी काळात होत असलेल्या सर्व निवडणुका पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी लढवल्या जातील तसेच यासाठी सर्व बहुजन मागासवर्गीय भटके विमुक्त जाती- जमाती यांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष वाढीसाठी “गाव तिथे शाखा” “शाखा तिथे कार्यकर्ते” तयार करून सर्वसामान्य नागरिकांच्या अडी- अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल. त्या बरोबर करमाळा तालुक्यातील शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी वेळ पडली तर मोर्चे- आंदोलन करून विकासकामासाठी प्रयत्न करणार असून युवक, शालेय विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य जनतेला काहीही अडचण आली तर कधीही आमच्याशी संपर्क करू शकता. तुमची सेवा करण्याची तयारी आहे. समाज कार्यातून राजकारणाकडे हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन येत्या काही दिवसातच शहर व तालुक्यातील युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून काँग्रेस पक्ष वाढसाठी प्रयत्न करणार असल्याचे मनोगत नूतन अध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी व्यक्त केले. यावेळी करमाळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापराव नामदेव जगताप यांनी मनोगत व्यक्त करून करमाळा विधानसभा युवक काँग्रेसचे नूतन तालुका अध्यक्ष साहेबराव वाघमारे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी करमाळा तालुका काँग्रेस साहेब ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष गफूरभाई शेख, काँग्रेस आय पक्षाचे भटक्या विमुक्त जाती जमातीचे तालुकाध्यक्ष देवराव सुकळे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप,तालुका उपाध्यक्ष आनंद झोळ, मातंग एकता आंदोलन ता.अध्यक्ष.शरद पवार योगेश राखुंडे, चंद्रकांत साळवे, राहुल दामोदरे,दादा आरणे, नितीन आरणे,नितीन चोपडे, प्रतीक जगताप, अजय कांबळे,यश कांबळे, विजय कांबळे, आबासाहेब आवटे, अविनाश वाघमारे, रोहित खरात तसेच विविध शाखेचे पदाधिकारी, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


