Monday, September 21, 2026
Latest:
Uncategorized

सोलापूर मुद्रांक जिल्हाधिकारी श्री पोपट भोई यांचा लोकविकास डेअरी येथे मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महेंद्र नगरे यांच्या हस्ते सन्मान संप्पन

करमाळा प्रतिनिधी सोलापूर मुद्रांक जिल्हाधिकारी श्री पोपट भोई यांचा लोकविकास डेअरी पांगरे या ठिकाणी मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेंद्र नगरे यांच्या उपस्थितीत सुरताल संगीत विद्यालय करमाळा तालुका  डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना लोकविकास डेअरी यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. लोकविकास डेअरी चे सर्वेसर्वा मालक दिपक आबा देशमुख यांच्या वतीने मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेंद्र नगरे  पोपटराव भोई यांचाही सन्मान करण्यात आला. लोकविकास डेअरी कार्य कौतुकास्पद असुन ग्राहकांना भावणारे पदार्थ देऊन ग्राहकाच्या मनामध्ये जिव्हाळ्याचे प्रेमाचे अतूट नाते निर्माण करून लोक विकास डेअरीने आपली ओळख निर्माण केली असुन करमाळा तालुकावाशिय म्हणून आपल्याला सार्थ अभिमान वाटतो असे मत डॉक्टर महेंद्र नगरे यांनी व्यक्त केले व लोक विकास डेअरीच्या उज्वल वाटचालीसाठी  दिपक आबा देशमुख यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे, लोकविकास डेअरीचे मालक दीपक आंबा देशमुख करमाळा तालुका  डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश मडके ,संचालक किशोर नरारे, मच्छी पालन व्यवसायिक सुनील भोई  लोकविकास चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!