करमाळ्याचे दिग्दर्शक महेंद्र पेठकर यांना आतंरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक’ पुरस्काराने सन्मानित
करमाळा प्रतिनिध करमाळ्याचे दिग्दर्शक महेंद्र पेठकर यांना आतंरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.आतंरराष्ट्रीय रिल्स फिल्म फेस्टिव्हल ‘ छत्रपती संभाजी नगर येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात करमाळा येथील दिग्दर्शक महेंद्र पेठकर यांना उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्यांनी अनुभव ‘ या चित्रपटाचे उत्तम दिग्दर्शक केले होतेआजकाल च्या धावपळीच्या जीवनात आपला छंद जोपासणारे खुप कमी लोक असतात अशाच प्रकारे आपल्या जीवनातील संघर्ष करत नोकरी,संसारतून वेळ काढत महेंद्र पेठकर हे चित्रपट आणि लिखानाचा छंद जोपासत त्यांना तब्बल दोन आतंरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार मिळाले आहे,
मुळ करमाळा गावचे महेंद्र हरिचंद्र पेटकर हे नोकरीसाठी कडा येथील अमोलक जैन संस्था मध्ये नोकरी करत आहेत नोकरी सांभाळून त्यांनी हा छंद जोपासला आहे त्यांनी विविध चित्रपटात दिग्दर्शकाचे काम केले आहेत तसेच “समर्पण” नावाची कादंबरी त्यांनी लिहिली आहे ही
आपल्या चित्रपटांतून समाजोपयोगी विविध संदेश दिले आहे आणि ग्रामीण भागात कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्टेज उपलब्ध करून देत आहेत,याच अनुषंगाने त्यांना गेल्या वर्षी मुंबई येथे राज्यपाल रमेश जी बैस यांच्या हस्ते पुरस्कार दिले होते एका वर्षात दोन आतंरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे
ग्रामीण भागातील कलावंतांना स्टेज उपलब्ध करून देणे त्यांना प्रोत्साहन देणे आणि समाजातील व्यसनाच्या आहारी चाललेली तरुण पिढी अशा अनेक विषयांवर आपल्या लिखान व चित्रपटाद्वारे समाज प्रबोधन करण्याचे कार्य या पुढेही करणार आहोत जेवढे योगदान आपल्या माध्यमातून देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न मी करणार आहे असे दिग्दर्शक महेंद्र पेठकर यांनी बोलताना सांगितले.
