करमाळा तालुक्याचे सुपुत्र दिग्दर्शक महेंद्र पेठकर लिखीत तेजवार्ता फिल्म्स निर्मीत अनुभव लघुपटाचा मुंबईत बोलबाला
करमाळा प्रतिनिधी
मुंबई येथे सहावा मूनव्हाईट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सोहळा अंधेरी येथील मुक्ति ऑडीटोरीयम येथे मोठचा दिमाखात पार पडला. या फिल्म फेस्टीवल मध्ये लेखक / दिग्दर्शक श्री महेंद्र पेठकर यांच्या अनुभव या लघुपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. दर्जेदार उत्कृष्ट ग्रामिण लघुपट असलेल्या अनुभव ला बेस्ट शॉर्ट फिल्म सिन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेजवार्ता फिल्म्स प्रॉडक्शन निर्मीत या लघुपटाचे निर्मातसय्यद बबलूभाई पत्रकार व अनिस मोमिन हे असुन लेखन दिग्दर्शन महेंद्र पेठकर यांनी केले छायांकन हमजान शेख यांनी केले तर संकलन अमन सय्यद यांनी केले या लघुपटाचे चित्रीकरण आष्टी तालुक्यात झालेले आहे यातील प्रमुख कलाकार आकाश पेठकर हनुमंत निमगिरे, राणी कासलीवाल, अशोक अडागळे , गोपिनाथ मेहेर, बाळासाहेब इंगळे, सय्यद रिजवान इ. होते.या लघुपटाला मुंबईकरांनी पसंती दर्शविली महेंद्र पेठकर यांनी मुंबई येथे या सोहळ्यात पारितोषीक प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते स्विकारले यावेळी त्यांच्या सोबत फिटनेस टेलर्स महेश वैद्य, कांबळे सर उपस्थित होते. महेंद्र पेठकर हे व सर्व टिमचे अभिनंदन कडा येथील नावाजलेले अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ व आष्टी तालुक्यातील मान्यवर व मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहेमहामहीम राज्यपाल आदरणीय रमेश जी बैस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.या सोहळ्याची सुरुवात सन्माननीय राज्यपाल रमेश जी वैस, पद्मश्री अनुप जलोटा, सुप्रसिद्ध गीतकार समीर सुप्रसिद्ध गायिका जसविंदर, नरुलाजी पंडित, सुभाषित राज , सौ शिप्रा राज आणि देवाशिष सरगम, प्रसिद्ध गायक आगम निगम यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवातवोदित कलाकारांना जसे की लेखक, निर्देशक, अभिनेते, शॉर्ट फिल्म व म्युझिक या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना एक प्लॅटफॉर्म मिळवून देण्याची संधी मून व्हाईट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल द्वारे मिळते असे प्रतिपादन या फिल्म फेस्टिवल चे सर्वेसर्वा डायरेक्टर देवाशिष जी सरगम यांनी केले. ते गेली सहा वर्षे या फिल्म फेस्टिवलचे आयोजन करत आहेत. पद्मश्री अनुप जलोटा जी आणि पंडित सुभाषित राज व शिप्रा राज यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सर्व प्रकारचे सहाय्य मिळत आहे तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाची मोलाची साथ मिळत आहे असे देवाशीष सरगम जी यांनी नमूद केले आहे.
