महादेव यात्रेनिमित्त जेऊरवाडी येथे 28 मे रोजी कुस्ती स्पर्धेचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी. करमाळा तालुक्यातील जेऊरवाडी येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दरवर्षीप्रमाणे ग्रामदैवत श्री महादेव यात्रेनिमित्त शनिवारी 28 मे ला जेऊर-करमाळा बायपास जेऊर येथे
भव्य कुस्ती मैदान होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा माढा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत पहिली कुस्ती पैलवान महारुद्र काळेल व पैलवान सुनील फरतडे (पुणे) यांची तर दुसरी कुस्ती अनिल जाधव (कुर्डवाडी) व राघू ठोंबरे (कोल्हापूर) तसेच तिसरी कुस्ती भैरव माने (जेऊरवाडी) व लिंगराज होनमाने (कोल्हापूर), चौथी कुस्ती सतपाल सोनटक्के (कंदर) व सुनील खताळ (कोल्हापूर) या प्रमुख कुस्त्या नेमलेल्या आहेत तसेच इतर लहान गटात ते मोठा गटपर्यंत दीडशे ते दोनशे कुस्त्या नेमल्या गेले आहेत. या कुस्त्याचा आयोजन महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे व ग्रामस्थ यांनी केले आहे.
