Monday, April 21, 2025
Latest:
करमाळाराजकीय

काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री धवलसिंह मोहिते मोहिते पाटील यांना महामंडळाचे अध्यक्ष करण्याची प्रताप जगताप यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी    महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना मंत्रिमंडळात घ्यावे  तसेच सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणितीताई शिंदे या असून त्यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री करावे व सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांना महामंडळाचे अध्यक्ष करण्यात यावे अशी मागणी करमाळा तालुका काँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केली आहे असा ठराव करमाळा येथील पत्रकार परिषद मध्ये करण्यात आला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की   करमाळा तालुक्यातील काँग्रेस आय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळत नाही.  करमाळा तालुक्यातील  शासकीय समितीमध्ये  पालकमंत्री भरणेमामांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना समितीत घेण्यास दुजाभाव केला आहे असे मत करमाळा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.  आमदार संजयमामा शिंदे यांच्या सांगण्यावरून बेरजेचे राजकारण करत काँग्रेसच्या  पक्षातील कार्यकर्त्यांना समितीमध्ये घेण्यात आले नसल्याचे प्रताप जगताप यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले. करमाळा तालुक्यामध्ये विकास कामाच्या बाबतीत सुद्धा का अन्याय होत आहे प्रत्येक शासकीय योजनेपासून सत्ता असूनही काँग्रेसला वंचित राहावे लागत असेल तर जिल्ह्याचे पालकमंत्री व करमाळा तालुक्याचे आमदार यांच्यामुळेच दुजाभावाची वागणूक काँग्रेसला मिळत असल्याने पक्षाने लक्ष घालावे पुढे बोलताना म्हणाले स्वराज्य संस्थेच्या निवडणुका   सर्व निवडणुका आम्ही पक्षाचा आदेशानुसार  स्वबळावर लढणार जर घटक पक्ष आमच्या  पक्षाच्या सोबत युती करण्यास तयार असेल तर पक्षाच्या आदेशानुसार काँग्रेस पक्ष पंजा चिन्ह घेऊन लढणार  असल्याचे जगताप यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले यावर अधिक बोलताना म्हणाले लाकडी लिंबोडी योजना तात्काळ रद्द करण्यात यावी नाही  तर करमाळा तालुक्यावर अन्याय झाल्याशिवाय राहणार नाही उजनीच्या पाण्यावर अनेकांचा डोळा आहे  राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन योजना रद्द करावी आणि करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे काँग्रेसचे करमाळा तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप सांगितले आहे.यावेळी शहराध्यक्ष अक्तर सय्यद,सोशल मिडीया प्रमुख अमोल पवार, तालुका प्रवक्ते नितीन चोपडे, सुजय जगताप, योगेश राखुंडे,उत्तरेश्वर सावंत,दिपक पडवळे,विजय तळेकर,बबलु चिंचकर,सचिन कटारिया,आदी उपस्थित होते.
error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group