शेलगाव क येथे उद्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा… आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घघाटन .
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेलगाव क येथे उद्या संभाजी महाराज जयंती निमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून उद्या सकाळी 10 वाजता त्याचे उद्घाटन आमदार संजयमामा शिंदे यांचे शुभहस्ते व उद्योजक भरत अवताडे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. या स्पर्धेचा लाभ पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमींनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 11111 हे युवा उद्योजक भरत अवताडे यांचे वतीने देण्यात येणार असून द्वितीय पारितोषिक 7777 चेअरमन स्वप्निल पवार , आ.संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर, ग्रामपंचायत सदस्य राहुल कुकडे , सरपंच अशोक काटोळे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तृतीय पारितोषिक 5555 रुपये असून उपसरपंच सचिन वीर व ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण ढावरे यांचे तर्फे हे बक्षीस देण्यात येणार आहे. चतुर्थ पारितोषिक 3333 रुपये असून श्री विजय आवटे कृष्णा हायटेक नर्सरी सौंदे यांच्या तर्फे पारितोषिक दिले जाणार आहे. या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला दिल्या जाणारे चषक यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांचेतर्फे दिले जाणार आहे. तसेच स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज , बेस्ट बॉलर ,बेस्ट बॅट्समन यांना प्रत्येकी 1 हजार रुपये तसेच सलग 4 षटकार, सलग 3 विकेट यांना प्रत्येकी 501 अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
या स्पर्धेमध्ये प्रवेश फी 500 रुपये असून नाव नोंदणी साठी माऊली शिंदे 77 45 0 808 92, शिव शंकर शिंदे 74 98 36 38 59, लहू शिंदे 97 67 29 35 96, सचिन वीर 90 21 41 05 48, अमोल पायघन 86 05 34 31 73 यांचेकडे संपर्क करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. सदर स्पर्धा शेलगाव क येथील माळी वस्ती नंबर 1 या ठिकाणी होणार आहेत..
