करमाळा

अहिल्याबाई होळकर जयंतीसाठी करमाळा तालुक्यातून हजारो समाज बांधव जाणार… माजी पंचायत समिती सदस्य विलास दादा पाटील यांची माहिती…

करमाळा प्रतिनिधी 
धनगर समाजाचे आराध्य दैवत अहिल्याबाई होळकर जयंती साठी दिनांक 31 मे रोजी करमाळा तालुक्यातून 150 गाड्यांच्या माध्यमातून हजारो समाजबांधव जाणार असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सदस्य विलास दादा पाटील यांनी शासकीय विश्राम गृह करमाळा येथे आयोजित केलेल्या समाजबांधवांच्या बैठकीनंतर पत्रकारांना दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, अहिल्याबाई होळकर या आमच्या धनगर समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. तालुक्यामधून दरवर्षी त्यांच्या जयंतीसाठी हजारो समाजबांधव त्यांना अभिवादन करण्यासाठी चौंडी ता. जामखेड या ठिकाणी जात असतात. या समाजबांधवांना चौंडी या ठिकाणी जाता यावं यासाठी 150 गाड्यांची व्यवस्था केलेली असून त्याचा लाभ समाज बांधवांनी घ्यावा . अधिक माहितीसाठी अनिल शेजाळ – 95 95 67 04 44 ,अशोक पाटील – 94 21 06 33 07, प्रकाश थोरात – 93 73 85 18 48, संग्राम पाटील – 88 30 67 1674 व वैभव कोकरे – 77 85 84 84 84 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.
अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त आयोजित केलेल्या आजच्या समाजबांधवांच्या बैठकीसाठी जिल्हा दूध संघाचे विद्यमान संचालक अशोक पाटील, विलास पाटील, अनिल पाटील ,अनिल शेजाळ, प्रकाश थोरात, जालिंदर कोकरे ,वैभव कोकरे, दीपक मारकड, दादा नरोटे, राहुल चोरमले, लाला काळे, भाऊसाहेब खरात, समाधान भोगे, हिराजी कोंडलकर, नागा पाटील, आदेश बंडगर, संभाजी कोळेकर, किरण तरंगे ,अशोक तरंगे, परमेश्वर श्रीरामे ,भारत केसकर ,अनिल वाघमोडे, बबन कावळे, एन.जी. हाके आदीसह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!