तरटगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी अभिजित पाटील उपाध्यक्षपदी जगदाळे
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील तरटगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी अभिजीत पाटील यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी प्रभाकर जगदाळे यांची निवड झाली. ‘सभासदाचे हीत हाच आमचा गट असून डॉ. प्रदिपकुमार जाधव पाटील हेच आमचे दैवत आहेत,’ असे निवड झाल्यानंतर सांगितले.
तरटगाव सोसायटीचे संचालक मंडळ बिनविरोध झाले होते. कर्जदार गटातून संतोष बुवासाहेब जाधव पाटील, अभिजीत प्रदिपकुमार जाधव पाटील, रामचंद्र भिवाजी जाधव, चेतन कैलास जाधव, संजय भिमराव जाधव, राजकुमार रावसाहेब घाडगे, सुदाम मच्छींद्र लेंडवे, संंतोष केशवराव मोरे तर अनुसूचीत जाती जमातीमधून सेवानिवृत महापालिका उपायुक्त प्रभाकर श्रीरंग जगदाळे, भटक्या विमुक्त जाती जमातीमधून भारत रावसाहेब जाधव, इतर मागासवर्गीयमधून माजी सरपंच उषा रेवण माने, महिलामधून मिनाक्षी विलास पाटील, रत्नमाला दिलीप घाडगे यांची निवड झाली. सहाय्यक निंबधक दिलीप तिजोरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहिले.
