Monday, April 21, 2025
Latest:
करमाळाजलविषयक

लाकडी-लिंबोडी उपसा सिंचन योजना विरोधात करमाळा उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती आक्रमक; योजना रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन

करमाळा प्रतिनिधी इंदापूर व बारामती तालुक्यासाठी महत्त्वाची असणाऱ्या लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजनेला तसेच क्रष्णा मराठवाडा जेऊर बोगद्यासंबंधीच्या जाचक तरतूदीला विरोध करत करमाळा तालुक्यातील उजनी धरणग्रस्तांनी आज करमाळा तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना निवेदन सादर केले . निवेदन नायब तहसीलदार बदे यानी स्विकारले.
निवेदन देताना उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती चे अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती प्रा शिवाजीराव बंडगर, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष शहाजी राव देशमुख, बाजार समिती चे संचालक चंद्रकांत सरडे, आदिनाथचे माजी संचालक भारत साळुंके, मकाई चे संचालक संतोष देशमुख,अजित रणदिवे, बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, युवराज रोकडे, भाऊसाहेब शेळके, विकास पाटील, हिराजी चौगुले, भैरवनाथ बंडगर, नागनाथ मंगवडे, सुयोग झोळ,नितीन आढाव,अर्जुन तकीक, विजय रोकडे,दत्ता बापू देशमुख, बाबासाहेब चौगुले, धनंजय गायकवाड, महेंद्रसिंग ठाकुर, गंगाराम वाघमोडे, देवीदास साळुंके, वैभव पाटील, शिवसेना शहर प्रमुख प्रवीण कटारिया, उपप्रमुख गानबोटे,तानाजी देशमुख, गणेश पाटील, राजकुमार आदिनाथ देशमुख, अर्जुन वारगड, पंडीत रणदिवे,रामहरी झांझुर्णे, अक्षय सरडे,आदि उपस्थित होते.
निवेदनात लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजना ही नियोजन बाह्य असल्याने ती रद्द करावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे. तसेच क्रष्णा मराठवाडा जेऊर बोगद्यातून मराठवाडा ला पाणी देताना उजनी शंभर टक्के भरले नंतर च द्यावे अशी तरतूद करण्याची मागणी करण्यात आली आहे. उजनी जलाशय ते कोळगाव धरण या दरम्यान जेऊर बोगद्यावर परिसरातील शेतकर्याला पाणी परवाणे द्यावेत अशी ही मागणी करण्यात आली. हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालक मंत्री दत्ता भरणे ,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर याना देण्यात आले आहे.
वरील मागण्यांचा सहानुभूती पूर्वक तात्काळ विचार करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदन कर्त्यानी दिला . निवेदन देण्यासाठी शेकडो नागरिक यावेळी तहसीलदार कार्यालयात आले होते .
उजनी जलाशयातील 84 .34 टी एम सी पाण्याचे वाटप वाटप 1997 पूर्वी च झाले असताना इंदापूर बारामती ला पाणी नेण्यासाठी आकड्यांची मोडतोड करीत अधिकारी हाताखाली धरून योजना बाह्य व नियम बाह्य पद्धतीने उजनी तील पाणी पळवण्याचा प्रयत्न पालकमंत्री दत्ता मामा भरणे करीत असून तात्काळ ही योजना रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करणार आहोत.
प्रा शिवाजीराव बंडगर

अध्यक्ष

उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती करमाळा तालुका

सरकार चुकीच्या पद्धतीने वागत असून मूळ धरणग्रस्तांच्या तोंडातील घास हिसकावून घेत आहे . आम्ही आमची घरे दारे जमिनी, गावे जलाशय साठी देवून त्याग केला आहे. आमच्या हक्काचं पाणी कुणी हिसकावून घेत असेल तर ते खपवून घेणार नाही. सरकारने तात्काळ ही योजना रद्द करावी

चंद्रकांत सरडे

संचालक ,बाजार समिती,

करमाळा

कृष्णा मराठवाडा जेऊर बोगद्यातूनमराठवाडा ला पाणी देताना उजनी धरण शंभर टक्के भरले नंतर च द्यावे.

शहाजीराव देशमुख

माजी उपाध्यक्ष ,आदिनाथ कारखाना.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group