वाशिंबे येथे 31मे रोजी उजनी पाणी परिषद उपस्थित रहावे सरपंच सौ मनिषाताई झोळ वाशिंबे
वाशिंबे प्रतिनिधी वाशिंबे येथे ३१मे रोजी होणाऱ्या ‘उजनी पाणी परिषद ‘ कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व शेतकरी,धरणग्रस्त बंधुनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन वाशिंबे लोकनियुक्त सरपंच सौ.मनिषाताई नवनाथ झोळ यांनी केले आहे.या कार्यक्रमास करमाळा तालुक्याचे विकासप्रिय मा.आमदार नारायण आबा पाटील, जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी भोसले, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे,उदयसिंह मोरे पाटील, संतोष पाटील,संजय फरतडे यांच्यासह करमाळा तालुक्यातील सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
