करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जनतेचा मोठा पाठिंबा असून आगामी येणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पक्षाची ताकद दाखवून द्यावी -उमेश पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
करमाळा प्रतिनिधी. करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जनतेचा मोठा पाठिंबा असून आगामी येणाऱ्या निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवून द्यावी असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्वसामान्य न्याय देणारा जनता आपल्या आपल्याबरोबर खंबीरपणे उभी असून निवडणुकीमध्येआपली ताकद दाखवून द्यावी.करमाळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकी संवाद कार्यकर्तेता आढावा बैठकीच्या बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विचाराचा वारसा जपत यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील काम चांगले असून त्यांनी नियुक्ती केलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून गाव तालुका पंचायत समिती जिल्हा परिषद गटामध्ये पक्षाचे विचार ध्येय धोरण केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचून येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला करमाळा तालुका अध्यक्ष भरत भाऊ आवताडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष आशपाक भाई जमादार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी , प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वर्षाताई शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस युवती महिला जिल्हाध्यक्षा ऋतुजा सुर्वे, युवक प्रदेश सचिव शिरीष ताटे , आण्णासाहेब पवार,राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष शितल क्षीरसागर युवक कार्याध्यक्ष अक्षय भांड, करमाळा शहराध्यक्ष शिवराज जगताप.मा. तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील,महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे,पश्चिम भागाचे नेते नितिनराजे भोसले,लेबर फेडरेशन चे सदश्य मानसिंग खंडागळे
जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ देशमुख महिला जिल्हा सरचिटणीस नंदिनी लुंगारे महिला तालुकाध्यक्षा शीतल क्षीरसागर
तालुका उपाध्यक्षा यशोदा शिंदे,तालुका युवक कार्याध्यक्ष अक्षय गायकवाड,शहर उपाध्यक्ष आझाद शेख,युवक जिल्हा खजिनदार राजेंद्र सूर्यवंशी,अभिजित सरडे,प्रसाद जगताप,सोहेल बागवान प्रसाद जगताप ,सोहेल बागवान,किशोर नारारे,आकाश आवताडे
महेश आवताडे,पप्पू चोरमुले,सुहास ओहोळ उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले की नुसती नावापुरते पद घेऊन त्या पदाचा गैरवापर करून अवैध धंदे करणाऱ्या कार्यकर्त्यांना पदावरून निलंबित केले जाईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून जनतेच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विषयी आपुलकी निर्माण करून आपला पक्ष मजबूत करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना करमाळा तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे म्हणाले की करमाळा तालुक्यातील जनता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमचे नेते माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भरघोस यश मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता संवाद व आढावा बैठकीला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आढावा बैठकीमध्ये युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार शहराध्यक्ष एडवोकेट शिवराज जगताप हनुमंत मांढरे पाटील अण्णासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात करमाळा तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या वतीने पक्षाच्या महत्त्वाच्या पदावर निवड करून जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते त्यांचे निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेची कामे करावी तहसील जिल्हा परिषद पंचायत समिती ,पोलीस स्टेशन, बांधकाम विभाग भूमी अभिलेख सर्व कार्यालयांमध्ये कुठल्याही प्रकारची अडवणूक झाल्यास तुम्ही मला कधीही फोन करा काम नाही झाले तर उमेश पाटील नाव लावणार नाही पण त्याकरता तुम्ही प्रामाणिकपणे जनतेची कामे करण्याचा प्रयत्न करा मी सदैव आपल्याबरोबर आहे. सर्वसामान्य जनतेची कामे तुम्ही केल्यानंतर जनता तुम्हाला नक्कीच पाठबळ देणार असून तुमच्या कामाची पोहचपावती तुम्हाला निवडणुकीमध्ये मिळणार आहे. त्यामुळे आता सर्व मरगळ झटकून उत्साहाने येणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करमाळा विधानसभा तालुका समन्वयक एडवोकेट विक्रम सावळे यांनी केले. स्वागत जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी केले तर आभार आशपाक जमादार यांनी मांनले.


