करमाळा

करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगीरी अर्जुननगर येथील शेतीच्या बांधावरुन झालेल्या खुन प्रकरणातील आरोपी १२ तासात जेरबंद.

करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी केली असुन करमाळा तालुक्यातील अर्जुन नगर येथील शेतीच्या बांधावरुन झालेल्या खुन प्रकरणातील आरोपीला १२ तासात जेरबंद करण्यात आले आहे.  याबाबत हकिकत अशी की सात जुन रोजी सकाळी ०९:३० वाजण्याचे सुमारास मौजे अर्जुननगर ता. करमाळा येथील राजेंद्र गोपीनाथ घाडगे यांचे शेतात समाईक बांधावरील झाड उत्तरेश्वर लहु रोकडे यांचे जे.सी.बी.चे सहायाने तोडणेचे काम चालु होते, तेथे तात्याबा बाबुराव रोकडे व नागनाथ उर्फ नागेश बाबुराव रोकडे यास यातील फिर्यादी सतिश भुजंग रोकडे यांचे वडील भुजंग सावळा रोकडे, वयः ६५ वर्षे, रा. अर्जुननगर, ता. करमाळा यांनी झाडाच्या फांदा चारीमध्ये टाकु नका असे बोलले असता त्याचे कारणावरुन तसेच सामाईक बांधाच्या वादाचा राग मनात धरुन तात्याबा बाबुराव रोकडे व नागनाथ उर्फ नागेश बाबुराव रोकडे यांनी भुजंग सावळा रोकडे यांना लाथाबुक्क्याने मारहान करुन शिवीगाळ करुन तात्याबा बाबुराव रोकडे याने त्याच्या खिशातील चाकुने भुजंग सावळा रोकडे यांच्या छातीच्या डाव्या बाजुस बरगडीवर भोकसुन खुन केलेबाबत माहिती मिळाल्याने तात्काळ श्री. अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा उपविभाग, करमाळा तसेच पो.निरीक्षक रणजीत माने यांनी सदर ठिकाणी पोलीस पथकासह भेट देवुन आरोपी यांचा शोध घेणेकामी पथक रवाना करुन यातील आरोपींना तात्काळ जेरबंद केले तसेच करमाळा पोलीस ठाणेससदर घटनेबाबत गु.र.नं. ४६४/२०२५, भा. न्या.सं. कलम १०३(१), ११५(२), ३५२, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदरा गुन्हयाचा तपास स.पो.नि./ पोपट टिळेकर हे करीत आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी साो. सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक साो. श्री. प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील साो., करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.निरीक्षक रणजीत माने, स.पो.नि./ पोपट टिळेकर, पो.उप. निरी./संदीप बनकर, स.पो.उप.निरी. विश्वास शिनगारे, पोलीस कॉन्स्टेबल विलास भराटे,.नाईकनवरे, लोहार,अजित उबाळे, चौधरी,मनिष पवार, वैभव ठेंगल, रामगुडे, तौफिक काझी, ज्ञानेश्वर घोगडे, सोमनाथ जगताप, योगेश येवले, रविराज गटकुळ, पो मिलींद दहीहंडे अमोल रंदील यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!