करमाळा

आषाढी यात्रेमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल होमगार्ड समादेशकांचा सन्मान


करमाळा (विशेष प्रतिनिधी सचिन जव्हेरी) आषाढी यात्रा बंदोबस्त करिता सोलापूर जिल्हा,सांगली,बिड,धाराशिव येथुन आषाढी यात्रा बंदोबस्त करिता मोठ्या प्रमाणात होमगार्ड जवानांना बोलाविण्यात आले होते. या सर्व होमगार्ड जवानांकडून उत्कृष्ट काम करून घेवून, आषाढी यात्रा निर्विघ्नपणे पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून पार पाडल्याबद्दल प्रत्येक पथकाच्या होमगार्ड अधिकाऱ्यांचा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांचे स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सदरचा सन्मान सोहळा कार्यक्रम पंढरपूर येथील समादेशक अधिकारी होमगार्ड पथक पंढरपूर येथे संपन्न झाला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुनराव भोसले,पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके,सोलापूर जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाचे नवनिर्वाचित केंद्रनायक मळसिद्ध कोकरे,पोलीस निरीक्षक श्री.वाघे,पंढरपूर पो. स्टे.चे सि.ओ.श्री हांगे,श्री.शेटे,श्री.शेळके उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला विठु माऊलिंच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून पुजन करण्यात आले.
यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुनराव भोसले,पो. निरीक्षक. घोडके,होमगार्डचे केंद्रनायक श्री.कोकरे ,यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना श्री भोसले म्हणाले की,आजपर्यंत होमगार्ड जवानांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्याचा इतिहास आहे, हा इतिहास असाच पुढे चालत राहवा व होमगार्ड कडुन कर्तव्य बजावून घेणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी आपल्या मनोगतात बोलताना केंद्रनायक श्री.कोकरे म्हणाले की,सर्वच ठिकाणच्या पथक अधिकाऱ्यांनी माझ्या नियोजनात योग्य साथ दिल्याने बंदोबस्त संख्या आम्ही 100%पुर्ण करू शकलो आहोत.
यावेळी बिड,सांगली,लातुर,धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वच समादेशक अधिकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व विठ्ठल- रूक्मिणीची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी अक्कलकोट होमगार्ड पथकाचे समादेशक अधिकारी विजयकुमार हंद्राळमट,मोहोळचे नानासाहेब वाघमोडे,सोलापूरचे राहुल इंगळे,वरिष् पलटन नायक संतोष कुंभार,करमाळाचे सचिन जव्हेरी,नातेपुतेचे गावडे,माळशिरसचे थोरात,वैरागचे किशोर भोसले,माढ्याचे गणेश चवरे,मंगळवेढाचे समाधान गरड, कुर्डुवाडीचे संकेत पाठक,अकलुजचे तुकाराम वजाळे,बार्शीचे जालिंदर देवकर,मंद्रुपचे सिध्दराम कुंभार, यांसह पंढरपुरचे कार्यक्रमाचे आयोजक सुरेश पवार,शामराव परचंडे यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंढरपुरचे समादेशक अधिकारी सुरेश पवार यांनी केले तर सूत्रसंचालन सोलापूर शहर होमगार्ड पथकाचे अधिकारी शिंदे यांनी केले.

होमगार्ड समादेशक अधिकाऱ्यांचा या अभूतपूर्व सन्माने सर्व होमगार्ड जवानांकडून अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे. यापुढेही यापेक्षा जोमाने काम करण्याचा मानस होमगार्ड व्यक्त करत आहेत.
.,

केंद्रनायक कोकरे यांच्या नियोजनाचे फलित*
आषाढी वारी असो अगर इतर वारी बंदोबस्त असोत होमगार्डची मागणी संख्या पुर्ण करणे खुप अवघड. परंतु सोलापूर जिल्हा समादेशक कार्यालयाचे केंद्रनायक मळसिद्ध कोकरे यांनी 100% होमगार्ड मागणी संख्या पहिल्या दिवशीच योग्य व परिपूर्ण नियोजन केल्याने ते अगदी सहज शक्य झाले याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होताना दिसत होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!