Monday, April 21, 2025
Latest:
करमाळाशैक्षणिक

जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी माध्यम वर्ग सुरु करण्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे आदेश

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा मधील इयत्ता 1 ली व इयत्ता 5 वी चे सेमी इंग्रजी माध्यम वर्ग सुरु करणेबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना लेखी निवेदनाद्वारे सूचना केल्या आहेत.त्यात त्यांनी म्हटले की, सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षाची नुकतीच सुरुवात झाली आहे. कोरोना कालावधीमुळे गेली २ वर्षांपासून शाळांचे शैक्षणिक कामकाज पुर्ण क्षमतेने सुरु नव्हते. सदयस्थितीत शाळा नियमितपणे सुरु असून मागील वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारीत ३० दिवसांचा सेतू अभ्यासक्रम सुरु आहे. यानंतर आपण नियमित अभ्यासक्रमास सुरुवात करणार आहोत.असे त्यांनी म्हटले आहे,
याबाबत पुढे त्यांनी म्हटले की, पालकवर्गाच्या मागणीनुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम चे वर्ग सुरु करण्याची बाब विचाराधीन होती. तसेच कोविडचा प्रार्दुभाव कमी झालेने शाळांचे कामकाज पुर्ववत झाले आहे. दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षापासून करमाळा गटातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता १ ली व इयत्ता ५ वी चे वर्गात सेमी इंग्रजी माध्यम सुरु करण्यात यावे. याबाबतचे नियोजन संबंधित मुख्याध्यापक यांनी करावयाचे आहे.
सेमी इंग्रजी माध्यम सुरु करत असलेल्या उपरोक्त इयत्तेची पुस्तके शाळाव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून लोकसहभागाद्वारे मुलांना उपलब्ध करून देणेत यावी. पुढील वर्षापासून सेमी इंग्रजी माध्यमाची पुस्तके समग्र शिक्षा अभियानातून पुरविण्यात येतील याची नोंद घ्यावी. तसेच चालू शैक्षणिक वर्षामध्ये प्रायोगिक तत्वावर इयत्ता १ ली व इयत्ता ५ वी या वर्गामध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरु करण्यात आले असून यापुढील कालावधीत टप्प्याटप्प्याने सर्व इयत्तांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरु करणेत येणार आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group