स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकतीनिशी लढा – भाजपा जिल्हाध्यक्ष- आ.सचिन कल्याणशेट्टी
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे नूतन जिल्हाध्यक्ष आ. सचिन दादा कल्याणशेट्टी हे करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांचे कंदर या ठिकाणी भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे व पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले ,
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून दौऱ्याची सुरुवात करण्यात आली, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जो सेवा पंधरवडा सुरू आहे त्या निमित्त जिल्हा परिषद शाळा कंदर या ठिकाणी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या, पुढे कविटगाव, पांगरे ,आजिनाथ सहकारी साखर कारखाना ,शेलगाव वांगी चौक ,कुंभेज फाटा, झरे फाटा, खडकेवडी फाटा, देवळाली ,करमाळा बस स्टॅन्ड, रंभापुरा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे उद्घाटन व स्वागत सत्कार करण्यात आले,
या नंतर स्वामी विवेकानंद कन्या प्रशाला करमाळा या ठिकाणी आरोग्य शिबिरास भेट देऊन करमाळा येथील केमिस्ट भवन या ठिकाणी पदाधिकारी आढावा बैठक घेण्यात आली,
या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष आ. सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढवून भाजपाचा झेंडा फडकवण्याचे आव्हान केले,
येणाऱ्या काळात पक्षाची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी करून कार्यकर्ता सक्षम करण्याचे काम आपण करू असे आश्वासन दिले, यावेळी भाजपा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण ,ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष प्रकाश घोडके, सुदर्शन यादव ,जिल्हा सरचिटणीस किरण बोकन ,शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल , राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार ,किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण केकान, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे ,धनंजय ताकमोगे, अमरजीत साळुंखे, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, अभिजीत मुरूमकर ,दादासाहेब देवकर, मच्छिंद्र हाके, दत्तात्रय तळेकर, अशोक ढेरे, वरकटनेचे सरपंच बापू तनपुरे, कोषाध्यक्ष बंडू माने ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मोहन शिंदे ,ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष धर्मराज नाळे ,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, मागासवर्गीय आघाडीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ भगत, शहर सरचिटणीस लखमीचंद हासिजा,व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया,उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हौसिंग,सहकार आघाडीचे सचिन चव्हाण,महिला आघाडीच्या संगीता नष्टे, राजश्री खाडे,चंपावती कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते ,
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केम शहराध्यक्ष गणेश तळेकर, भैया गोसावी,सागर नागटिळक ,विकास कळसाईत, प्रकाश ननवरे ,पांडुरंग लोंढे , आण्णा पडवळे, हर्षद गाडे ,सोमनाथ घाडगे ,किरण शिंदे ,सचिन पांढरे, विशाल घाडगे ,संदीप काळे, बाप्पू तांबे, वसीम सय्यद ,भैय्या कुंभार, सुदर्शन माने ,चैतन्य पाठक ,गणेश जाधव ,सुनील जाधव ,अशोक साळुंखे, हनुमंत रणदिवे, प्रताप देवकर,संजय जमदाडे गणेश वाशिमेकर
व सर्व शाखा अध्यक्ष यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले ,तर आभार जगदीश अग्रवाल यांनी मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा मोर्चा जिल्हा चिटणीस अमोल पवार यांनी केले,
