शेतकऱ्याच्या वीजेची सबस्टेशनची मागणी मान्य झाल्याने केलेल्या पाठपुराव्याला यश- दिग्विजय बागल
कोर्टी प्रतिनिधी आवाटी रावगाव येथे कृषी आकस्मिक निधी अंतर्गत ३३/११ के. व्ही. ऐ. चे नवीन वीज उपकेंद्र मंजूर करण्यात यावे कोर्टी व पांडे ऊपकेंद्रात नवीन अतिरिक्त ५ एम. व्ही. ए. चे ट्रन्सफॉर्मर बसवण्यात येथील ३३/११ के. व्ही. वीज सबस्टेशन यावे. अशी मागणी मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी मुंबई येथे मंत्रालयामध्ये महाविकास आघाडीचे तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन केली होती ती सध्याच्या युती शासनाने ही मागणी मान्य केली आहे.करमाळा तालुक्यातील आवाटी,रावगाव आसपासच्या गावातील शेतकऱ्यांची विजेची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने या परिसरात मागणीच्या अत्यल्प प्रमाणात वीजपुरवठा होता. या सर्व बाबी लक्षात घेऊन सबस्टेशनची मागणी केली होती ती पुर्ण झाली आहे यावेळी पुढे बोलताना दिग्विजय बागल यांनी बोलताना सांगितले की वीज सबस्टेशन मंजुर झाल्याने आवाटी, रावगाव, शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या नागरीकांचा प्रश्न सुटला असुन याची दखल घेतली असुन मागणी मान्य झाली असल्याने समाधान व्यक्त केले आहे.
