डॉ. दुरंदे गुरुकुल ,कोर्टी. स्कूलचा विद्यार्थी प्रथमेश सुदाम साखरे याची जवाहर नवोदय विद्यालयसाठी निवड झाल्याबद्दल केंद्रप्रमुख यांच्या हस्ते सत्कार संप्पन
कोर्टी प्रतिनिधी डॉ.दुरंदे गुरुकुल, कोर्टी या शाळेतील विद्यार्थी प्रथमेश सुदाम साखरे याची पोखरापूर ता . मोहोळ येथील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतचे मोफत व उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी तसेच सीबीएससी केंद्राचा अभ्यासक्रम याकरिता निवड झाली आहे. त्याला संबंधित परीक्षेत 99% गुण प्राप्त झाले आहेत.
.त्याच्या या निवडीबद्दल कोर्टी केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.आदिनाथ देवकतेसाहेब यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. तसेच त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना अनमोल असे शैक्षणिक मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. दुरंदे गुरुकुल ,कोर्टी या शाळेचे अध्यक्ष .डॉ. श्री.अमोल दुरंदे , सचिव श्री. दुरंदे सर , मुख्याध्यापिका सौ. चारुशीला जाधव , पंचायत समिती शिक्षण विभागाचे विषयतज्ञ शिंदे सर, प्रथमेश साखरेचे वडील श्री. सुदाम साखरे, राजुरीतील प्रगतशील बागायतदार श्री.नवनाथ दुरंदे तसेच या शाळेतील शिक्षक , कर्मचारी इत्यादी उपस्थित राहून त्याचे अभिनंदन केले आहे. व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका चारुशीला जाधव यांनी केले .कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. दुरंदे सर यांनी केली आणि शिंदे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.
